श्रीदेवी यांचा ‘मॉम’ चित्रपट मातृत्व दिनादिवशी चीनमध्ये होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ हा चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. मदर्स डे च्या निमित्ताने ‘मॉम’ हा चित्रपट चीन मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केले असून हा एक थ्रिलर चित्रपट आहे.

हा चित्रपट येत्या १० मे रोजी चीन मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती ‘मॉम’ या चित्रपटाचे व्यापार विश्लेषक तरन आदर्श यांनी ट्विटरवर दिली आहे.

२०१७ मध्ये ‘मॉम’ या चित्रपटातील त्यांच्या कामगिरीसाठी श्रीदेवींना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील हॉटेलमध्ये अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.