पुणे – मिसळ पाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती असणारा पदार्थ. शहर असो वा गाव खेडा प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी मिसळीचा आस्वाद घेतलेलाच असतो. हाच मिसळ पाव आता जगात भारी ठरला आहे. जगातील सर्वात चांगलीच शाकाहारी पदार्थांच्या यादीत मिसळ पावणे आपले स्थान कायम केले आहे. यामध्ये मिसळ पावणे देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
जगातल्या सर्वात चांगल्या पारंपरिक शाकाहारी पदार्थांमध्ये मिसळ पाव अकराव्या क्रमांकावर आहे. मिसळ पाव महाराष्ट्रीय असला तरी इतर ठिकाणी त्याचे वेगवेगळे रूप देखील पाहायला मिळते. ज्यामध्ये कोणी मिसळीचा आस्वाद ब्रेड सोबत घेतो तर कोणी कडक शेव टाकून खातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मिसळ आवडते.
मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळ पाव नाष्ट्यासह जेवण म्हणून देखील खालली जाते. वेळ सकाळ असो वा संध्याकाळ खाणाऱ्याचे पोट मात्र नेहमीच भरते. म्हणूनच अटलास या वेबसाईटकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये मिसळ देशात भारी तर जगात अकराव्या स्थानावर आहे.
पुणे,कोल्हापूर, खानदेश, नाशिक अशा ठिकाणी तर मिसळ पावलापावलवर पाहायला मिळते. एवढेच काय पण अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात मिसळच्या छोट्या गाड्यापासूनच सुरु केल्याचे देखील महाराष्ट्रात पाहायला मिळते.