पुणे – अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय. रक्षाबंधनचा मुहूर्त साधत हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच अनुषंगाने अक्षय कुमार सध्या ठीक ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पुण्यामध्ये देखील अक्षयने प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमारने थेट मिसळवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले.
अक्षय कुमार सर्वकाही आपल्या नियोजनानुसार करण्यासाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. अशात तो आपल्या व्यायामापासून ते खाण्या पर्यंतच्या सर्वच गोष्टींची काळजी घेत असतो. अशात पुण्यात आल्यानंतर मिसळ खाण्याचा मोह अक्षयलाही आवरता आला नाही. ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ या ठिकाणी मिसळ खाल्यानंतर अक्षयने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. प्रत्येक पुणेकराची जान आणि शान मिसळ पाव असे कॅप्शन देत श्रीमंत मिसळ खूप छान असं अक्षय कुमारने पोस्टमध्ये म्हंटल आहे.
View this post on Instagram
काही इंस्टाग्राम हॅन्डलरने अक्षय कुमारचा मिसळ खाण्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार मिसळीवर ताव मारताना दिसत आहे. सोबत अक्षयचे इतर सहकारी देखील दिसत आहेत. यादरम्यान अक्षयने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे देखील समजते.