पुणे विभागात प्रशासनातर्फे स्थलांतरित मजुरासाठी १०६ कॅम्प सुरु

पुणे : पुणे विभागात प्रशासनातर्फे स्थलांतरित मजुरासाठी १०६ कॅम्प सुरु करण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली; तर साखर कारखान्यांमार्फत ५५८ कॅम्प सुरु करण्यात आल्याचे ते म्हणाले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मजूर पुणे विभागात अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे अशा मंजुराना ते सध्या जिथे राहता आहेत तिथेच ठेवायचे आहे. त्यामुळे पुणे विभागात कॅम्प उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कॅम्पमध्ये त्यांना आत्यावश्यक सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहे. देशातील अनेक कामगार पुणे येथील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहे. त्या सर्व कामगारांसाठी ६६४ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ६० हजार ७९३ स्थलांतरित मजूर असून, १ लाख १९ हजार मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. तसेच पाणी,वीज शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.