राजगुरूनगर, (वार्ताहर)– येथील लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर तर्फे खेड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वस्तूरूपी मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. टाकळकरवाडी येथील शाळेत प्रथमोपचार साहित्याचे कीट देण्यात आल्या. तर सायगाव येथील तळ्याची वस्ती ठाकरवाडी येथे संगणक संच भेट देण्यात आला.
या एकशिक्षिकी शाळेत मुख्याध्यापक बनसोडे राबवित असलेल्या विविध उपक्रम पाहून लायन सदस्य भारावून गेले. याप्रसंगी क्लब अध्यक्ष नितीन दोंदेकर, सचिव डॉ. सागर गुगलिया, खजिनदार रमेश बोर्हाडे, प्रथम उपाध्यक्ष अमितकुमार टाकळकर, अमित बाणखेले, स्नेहल दोंदेकर, अश्विनी राक्षे, सर्पमित्र संतोष गारगोटे, सुनील राक्षे, कृष्णा दोंदेकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.