शिक्रापूर येथील प्रकार ः सोशल मीडियामुळे मायलेकाची भेट
शिक्रापूर -येथे हरवलेला तीन वर्षांचा शुभम सोशल मीडिया व शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने चार तासांत आईच्या कुशीत विसावला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील फर्जिना खोले या दुपारी तळेगाव रस्त्याजवळील त्रिमूर्ती मंगल कार्यालय जवळून जात असताना त्यांना तीन वर्षाचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत रडत असल्याचे दिसला.
त्यांनतर त्यांनी त्याला जवळ घेत त्यांचे पती भरत खोले यांना ही माहिती दिली. त्यानंतर खोले यांनी पत्रकार शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर त्या मुलाला शिक्रापूर पोलीस ठाण्यात घेऊन येत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिला.
सहायक उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक अशोक केदार, शेरखान शेख यांनी यांनी मुलाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शुभमचा फोटो सोशल मीडियावर पाहून त्यांनी त्वरित शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत आपल्या मुलाला कवेत घेत शिक्रापूर पोलिसांसह नागरिकांचे आभार मानले.