‘श्रीदेवी बंगलो’ नंतर प्रिया प्रकाश वारियर झळकणार आणखी एका हिंदी चित्रपटात

मुंबई – आपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया सध्या एका हिंदी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे नाव “श्रीदेवी बंगलो’ असे आहे. यात ती सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची भूमिका साकारत आहे.

यानंतर प्रिया प्रकाश वारियरला अजून एका हिंदी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘लव्ह हॅकर्स’ असल्याची माहिती मिळाली असून, हा थ्रिलर चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची शूटिंग गुडगाव, दिल्ली, लखनऊ आणि मुंबईमध्ये होणार असल्याचे समजते. हा चित्रपट मयांक प्रकाश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला आहे.

प्रियाने या अगोदर “ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटात काम केले आहे. याच चित्रपटातल्या डोळ्यांच्या सीनमुळे प्रिया प्रकाश वारियर इंटरनेट जगात आपल्या डोळ्यांच्या जादुई अदाकारीने एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.