मुंबई : उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय आणि अंबरनाथच्या कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील सोईसुविधांचा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आढावा घेतला.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आरोग्य सेवा आयुक्त डॅा. अनुपकुमार यादव उपस्थित.उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्यासह रुग्णालयातील सोईसुविधांचा दर्जा सुधारावा असे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले.