पुणे : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन होण्यास सुरुवात होत आहे. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपती ४.४५ मिनिटांनी अलका टॉकीज चौकात दाखल झाला होता. त्यानंतर विसर्जन मंडपाकडे पुढे सरकत असताना. 5 वाजून 35 मिनिटांनी करण्यात आले. श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करत केले पतांगा घाटावर गणपती विसर्जन करण्यात आले.
मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यातच आता पुण्यातील मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन झाले आहे.