परवेझ मुशर्रफ यांच्या शिक्षेबाबत होणार चर्चा
इस्लामाबाद: माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या शिक्षेबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे. पाक सैन्याने यावर काल नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीत लष्करप्रमुखांच्या मुदतवाढीसंदर्भात चर्चा होण्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
सूत्रंनी दिलेल्या माहिती नुसार, मुशर्रफ यांच्या शिक्षेबाबत खान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. विशेष म्हणजे विरोधकांमध्ये असताना खान यांनी राजद्रोह प्रकरणात मुशर्रफ यांच्या शिक्षेचे समर्थन केले होते.
पेशावर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाने काल माजी लष्करप्रमुखांना फाशीची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या दुबईत राहत आहेत. मुशर्रफ यांना शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा सैन्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.