नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंकडून आरोप करण्यात आले असून त्यासाठी सध्या ते दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. त्यानंतर सिह यांच्यावर दोन गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. पण अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे. आंदोलक खेळाडूंमध्ये टुकडे, टुकडे गँग घुसली असून त्यांचं टार्गेट मी नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण सिंह यांनी माध्यमांशी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी बोलताना,”जर माझ्या पक्षानं मला राजीनामा द्यायला सांगितलं तर मी राजीनामा देईन. पण ज्याप्रकारे टुकडे, टुकडे गँग, शाहीन बाग, किसान आंदोलन यामध्ये ज्या शक्ती सहभागी होत्या. त्याच शक्ती खेळाडूंच्या आंदोलनातही घुसल्या आहेत” असे म्हटले आहे.
#WATCH | If my party asks me to resign, I will resign…Forces involved in 'Tukde Tukde gang', Shaheen Bagh, 'Kisaan Andolan' seem to be involved in it (Wrestlers' protest), I am not their target, party (BJP ) is their target, these athletes are paid. Protest is expanding like… pic.twitter.com/AUzVGnk39V
— ANI (@ANI) May 1, 2023
एकूणच मी त्याचं टार्गेट नाही तर माझा पक्ष अर्थात भाजप त्यांचा टार्गेट आहे, हे खेळाडू पैसे घेऊन हे आरोप करत आहेत. कारण खेळाडूंचं हे आंदोलन आत शाहीन बागसारख वाढायला लागले आहे. उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये त्यांना फूट पाडायची आहे, असे अनेक गंभीर आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केले आहेत.
दरम्यान, या अगोदर देखील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना उद्देशून ब्रिजभूषण सिंह यांनी, “तुम्हाला जंतरमंतरवर आंदोलन करून न्याय मिळणार नाही. तुम्हाला न्याय हवा असेल, तर पोलीस ठाणे किंवा न्यायालयात जावं लागेल. ते (आंदोलनकर्ते कुस्तीपटू) आजपर्यंत पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात कधीही गेले नाहीत. न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल.” असे म्हटले होते. या सर्वात आता सिंह यांच्या आरोपांबाबत कुस्तीपटू नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे.