जम्मू – जम्मू काश्मीर विधानसभा 2018 मध्ये विसर्जित होऊनही अद्यापपर्यंत अनेक भाजप नेते तेथील सरकारी बंगल्यातच रहात असून राज्याच्या राज्यपालांनी त्यांना तेथे विनामोबदला राहु दिले आहे. असा आरोप ज्येष्ठ आप नेते आणि माजी मंत्री हर्ष देव सिंह यांनी केला आहे.
त्यांनी आरोप केला की, या नेत्यांना केवळ इस्टेट विभागाचे बंगलेच ठेवण्याची परवानगी नाही तर त्यापैकी अनेकांना कोणत्याही भाड्याशिवाय राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अलीकडेच एका माहिती अधिकार अर्जावर प्राप्त झालेल्या माहितीचा संदर्भ देत सिंग म्हणाले की, मालमत्ता विभागाचे अधिकारी कारवाई करण्यात कानाडोळा करीत असून भाजप नेत्यांची घरभाड्याची थकित रक्कम लाखो रुपयांच्या घरात पोहचली आहे. त्यांचे थकित वीजबिलही असेच लक्षावधी रूपयांचे आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पाल्यापाचोळ्यानेच इतिहास घडवलाय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
भाजपने या मालमत्तांचा वापर स्वताच्या पक्षाच्या प्रचारासाठीही सुरूच ठेवल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जम्मू काश्मिरात सेवा न बजावलेल्या अधिकाऱ्यांनाही जम्मूतील गांधीनगर इस्टेटमध्ये बंगले वाटप करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना मोठा धक्का; युरोपचा गॅस पुरवठा रशिया तोडणार