पाल्यापाचोळ्यानेच इतिहास घडवलाय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Updated On:

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहोत. पण, या पाल्यापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात ते जनतेने पाहिले आहे.
आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे काही म्हणायचं आहे; तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना आणखी काही बोलायचं आहे; ते बोलून होऊन द्या. त्यांचं पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रितपणे त्यावर बोलेन, असे शिंदे म्हणाले.





