मंचर -पारगाव (ता. आंबेगाव) येथे बेकायदा विक्रीसाठी आणलेल्या 1 हजार 92 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या मंचर पोलिसांनी सोमवारी (दि. 20) दुपारी कारवाई करून जप्त केल्या आहेत. बेकायदा दारू विक्री करणारा योगेश भाऊसाहेब काकडे (रा. जारकरवाडी) यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस जवान एस. बी. गिलबिले, व्ही. एम. साबळे यांनी घटनास्थळी गेले त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच दारू विक्री करणारा योगेश काकडे हा पळून गेला आहे. याबाबत पोलीस जवान व्ही. एम. साबळे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस जवान सागर गायकवाड करत आहे.