नारायणगाव -अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह दोघांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून 25 हजारांच्या रोख रकमेसह देशी-विदेशी दारू जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र रामकृष्ण पटाडे (रा. साळवाडी, ता. जुन्नर), रामजीत मानोराम निशाद (वय 23 रा. शिरोली, सुलतानपूर, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस नाईक धनंजय पालवे, सचिन कोबल, नवीन अरगडे यांनी ही कारवाई केली.