नवी दिल्ली : स्काॅटलंडचा स्ट्राइकर मेसन राॅबर्टसनच्या गोलच्या जोरावर रियल काश्मीर एफसी संघाने शनिवारी झालेल्या आय लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात गोकुलम केरल एफसीचा १-० ने पराभव करत विजय नोंदविला.
FT: Mason Robertson does the job 👏🏻 for @realkashmirfc ⚪️ to snatch their 2⃣nd consecutive win 🙌🏻
GKFC 0⃣-1⃣ RKFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #GKFCRKFC ⚔ pic.twitter.com/U0cQUMm6P8
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 8, 2020
रियल काश्मीर एफसी संघाकडून रोबर्टसन याने ४९ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर निर्धारित वेळेत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यात अपयश आल्याने अखेर हा गोल निर्णायक ठरला. या विजयामुळे रियल काश्मीर संघास ३ गुण मिळाले.
या विजयासह रियल काश्मीर संघाचे १५ गुण झाले असून ते गुणतालिकेत तिस-या स्थानी पोहचले आहेत. गोकुलम केरल एफसी संघ पाचव्या स्थानी असून त्याचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.