इम्रान खान यांनी फेटाळले तालिबानला मदत केल्याचे आरोप

इस्लामाबाद, दि. 18 – अमेरिकेने तालिबान सरकारला लवकर मान्यता दिली नाही तर परिस्थिती आणखीन बिघडेल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या ऐतिहासिक घडामोडी घडत आहेत. हा विषय प्रादेशिक पातळीवरील सध्याचा सर्वात मोठा विषय आहे, असे इम्रान खान यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

तालिबानला पाकिस्तानकडून होत असलेल्या मदतीबाबत विचारले असता, “जर पाकिस्तान तालिबानला मदत करू शकत असता, तर पाकिस्तान हा अमेरिकेपेक्षाही मोठा देश ठरला असता. 60 हजार योद्‌ध्यांकडून 3 लाखाच्या लष्कराचा पराभव करता येऊ शकला असता, असे इम्रान खान म्हणाले.

परकीय शक्तींच्या विरोधातील युद्ध म्हणजेच जिहाद आहे, असे अफगाणी नागरिक म्हणत आहेत. तालिबानने 20 वर्षांच्या अनुभवातून बरेच शिकले आहे. आम्ही म्हणजे पाकिस्तान केवळ भाड्याने घेतलेल्या बंदुका आहोत. आम्ही अमेरिकेला अमेरिकेतील युद्धात जिंकवून देणे अपेक्षित होते. मात्र ते आम्ही कधीही करू शकलो नाही, असेही खान म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर येण्यामागे पाकिस्तानचे हितसंबंध कारणीभूत आहेत. म्हणून पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचा फेरआढावा घेतला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन अलिकडेच म्हणाले होते. तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचे अनेक पुरावे असले तरी इम्रान खान यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.