ते मंदिर बनवतील तर आम्ही मशीद – फरहान आझमी

नवी दिल्ली – महाविकासआघाडीचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. यावर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमीचा पुत्र फरहान आझमी यांनी टीका केली आहे. मी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार असून ते मंदिर बनवतील आणि मी मशीद बनवेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

फरहान आझमी म्हणाले कि, उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. तर मी पण जाणार आहे. आपण सगळेच जाऊ. मी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही या दौऱ्यासाठी आमंत्रित करतो. ते राम मंदिर बांधतील, आम्ही बाबरी मशीद बांधू” असे फरहान आझमी म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबत घोषणा झाली होती. 7 मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचे दर्शन घेतील. तसेच शरयू तीरावर आरतीही करतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.