समाजकारण व राजकारण करताना त्यामध्ये गरिबी कधीच आड येत नाही; तर आपले कर्तव्य पार पडणे आणि गोरगरिबांची कामे करणे त्यांच्या समस्या सोडवणे त्यांच्या सुख दुखात सहभागी होणे त्यांच्या जीवनात आनंद फुलवणे ही कामे करत असताना. गावात विकासाची कामे करुन गावाचा चेहरामोहरा बदलून एक आदर्श गाव निर्माण करण्याचे काम केले आहे ते ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले पारगाव (ता. आंबेगाव) चे सरपंच बबनराव ढोबळे यांनी!
पारगाव येथे एका गरीब व वारकरी संप्रदायाच्या घरात बबनराव नामदेव ढोबळे यांचा जन्म झाला. शेतीत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत असत घरची परिस्थिती गरिबांची असल्याने इयत्ता दहावीवी मधून शाळा सोडवावी लागणी व वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावावा लागला. शेती करत असताना त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड निर्माण झाली. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेण्याबरोबरच गरिब कुटुंबातील आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे, त्यांच्या अडचणी सोडवून मदतीचा हात पुढे करणे, असे उपक्रम त्यांनी सुरु केले. ते बैलगाडा मालक असल्याने त्यांचा गावोगावच्या बैलगाडा मालकाशी संपर्क आल्याने त्यांचे समाजकरण फुलत गेले.
वर्ष 1993 मध्ये अगदी तरुण वयात ते ग्रांमपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आले. त्यानंतर ते सतत ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून येत राहिले. वर्ष 2003 ते 2006 आणि 2008 ते 2010 साली त्यांनी गावचे उपसरपंच म्हणून काम पाहिले. त्यावेळी तुकाईदेवी देवीच्या मंदिराचे काम, शाळेच्या इमारती, पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या आदी कामे केली.
गावातील लोकांच्या सहकार्याने व राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकास कामांचा धडाका लावला. गावात एक कोटी रुपयांची वाड्यावस्त्यांवरील आणि गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. तसेच वाचनालय इमारत, स्मशानभूमी शेड, तीन अंगणवाड्यांच्या इमारती, तसेच गावठाण रस्ता, बाजार तळ बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच 14 व्या वित्त आयोगातून मागसवर्गीय लोकांसाठी कामे हाती घेण्यात येणार आहेत. सामाजिक व राजकीय कामे करत असताना आळंदी पंढरपूर वारी ते दरवर्षी करतात. भजन व किर्तनात रंगणारे सरपंच म्हणून बबनराव ढोबळे हे ओळखले जातात.
यशस्वी कारकीर्द
वर्ष 2018 ला गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आले व थेट जनतेतून निवडलेला पहिला सरपंच म्हणून मान मिळविला.
संकलन: लक्ष्मण ढोबळे
पारगाव शिंगवे