दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याने तिसरे स्थान मिळवले आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने दुसरे स्थान राखले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीमुळे रेटिंग गुण वाढवले व या स्थानी झेप घेतली. त्याचे 807 तर, कोहलीचे 828 गुण झाले आहेत. या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अव्वल स्थान राखले असून त्यांचा फखर झमान आणि इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट यांनी टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
वेस्ट इंडीजचा शाई होप मात्र टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर कायम असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे.