नवी दिल्ली – तेलंगणा केडरचे आयएएस अधिकारी संदीप कुमार झा यांच्यावर त्यांच्या नवविवाहित पत्नीने अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथे याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संदीप झा हे 2014 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी कोरबा येथील एका मुलीशी लग्न केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याच्याविरुद्ध कलम 498 व 377 नुसार सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या पत्नीने यापूर्वी पोलिस ठाण्यात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. आयएएस संदीपचे लग्न नोव्हेंबर 2021 मध्ये बिहारमधील दरभंगा येथील एका रिसॉर्टमध्ये झाले होते. यानंतर त्याची पत्नी पतीसोबत हैदराबाद येथील आयएएस मुख्यालयाच्या निवासी वसाहतीत राहायला गेली. नंतर तो विचित्र वागू लागला, असे पत्नीने सांगितले.
आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीनेही हुंडा म्हणून वडिलांकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एंगेजमेंटच्या दिवशी यावरून बराच वाद झाला होता. यानंतर वडिलांनी शक्य ते प्रयत्न करून 1.70 कोटी रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू दिल्या. महिला मदत केंद्रातही तक्रार केल्याचे तिने सांगितले, मात्र वारंवार तारखा देऊनही पती फिरकला नाही.