नेवासा – नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि.विजय करे यांची नुकतीच कर्जत येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार नांदेड जिल्ह्यातील बेलोरी येथून नव्यानेच नगर पोलीस दलात आलेले पोलीस निरिक्षक शिवाजी (अण्णा) डोईफोडे यांनी नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला आहे यावेळी नेवासा पोलीस ठाण्यात माध्यमांशी संवाद साधत पञकारांशी चर्चा केली.
यावेळी पो.नि.डोईफोडे यांनी शहरातील पञकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,पोलीस आणि पञकार समाजातील या दोन जागृत घटकांनी समाजातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करुन आपण कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवणार आहोत माध्यमांकडे आपण साकारात्मक विचारातून पहात असून चुकीच्या घडामोडींबाबत माहीती दिल्यास त्याचे आपण स्वागत करु नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार आपण चोखपणे बजावणार असल्याची माहीती यावेळी त्यांनी पञकारांशी बोलतांना दिली.
यावेळी एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित,नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे,अध्यक्ष मोहन गायकवाड,जेष्ठ पञकार अशोक डहाळे, कैलास शिंदे, सुधीर चव्हण,राजेंद्र वाघमारे, शाम मापारी, मकरंद देशपांडे, अनिल गर्जे, सुहास पठाडे, शंकर नाबदे, सोपान भगत, अभिषेक गाडेकर ,सौरभ मुनोत यांच्यासह पञकार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शहरातील पञकारांच्यावतीने पो.नि.डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला.