मुंबई – मुंबई – आलिया रणबीरच्या घरी नुकतंच नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेल्या या जोडीला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अशात दोघेही मुलीचे नाव काय ठेवणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना आलियाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये आलियाने आई होण्यापूर्वी मुलीचे नाव ठेवण्याबाबत वक्तव्य केले होते.
काही वर्षांपूर्वी आलिया भट्टने एका रिऍलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आलियाने आपल्या मुलीचे नाव ठेवण्याबाबत भाष्य केले होते. यावेळी आलियाने एका स्पर्धकाला स्वतःचे नाव सांगून त्याचे स्पेलिंग विचारले त्यावर त्या स्पर्धकाने Alma असे नाव सांगितले. हे नाव आलियाला खूप आवडले आणि ती सहज बोलून गेली मी माझ्या मुलीचे नाव ‘अल्मा’ ठेवेल. नेटकऱ्यांकडून आता आलिया आई झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल केला जातोय.
आलिया आणि रणवीर सिंग ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपर डान्सर सिझन ३ या रिऍलिटी शोमध्ये आले होते. यावेळी एका स्पर्धकांशी संवाद साधताना घडलेला हा किस्सा आहे. आलिया आई होताच नेटकऱ्यांनी हा तिचा व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे.