मुंबई – आलिया भट्ट सध्या तिचा प्रेग्नेंसी टाइम खूप एन्जॉय करत आहे. यासोबतच ती सतत तिच्या कामावर देखील लक्ष देत असते. शनिवारी आलिया सिंगापूरमध्ये टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान, अभिनेत्री स्टेजवर पोहोचली आणि पुरस्कार स्वीकारताना एक सुंदर भाषण केले. यासोबतच ती म्हणाले की, माझे बाळ भाषणादरम्यान मला सतत किक मारत आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलीया तिच्या पोटातील मुलाबद्दल बोलताना दिसत आहे.भाषण करताना आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत होती. भाषणात आलिया म्हणते, ‘मला वाटतं 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा मला वाटत होतं की एक दिवस मी कस सर्वांना जिंकेल. मी कोण आहे आणि मी किती मेहनती, हुशार आणि हुशार, तेजस्वी आहे हे सर्वत्र प्रत्येकजण ओळखू शकतो. मला परिपूर्ण व्हायचे होते आणि जगालाही हे कळावे अशी माझी इच्छा होती.
View this post on Instagram
यानंतर या कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया आणि रणबीरच्या बाळाची त्यांचे फॅन्स देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.