मुंबई – सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक करण जोहरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात करण जोहरविषयी अनुष्काने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. ‘करणने मला चुकीचा पद्धतीने स्पर्श केला होता. ज्यामुळे मी सेक्शुअल हॅरेशमेंटची केस दाखल केली असती’, असे विधान अनुष्काने केले आहे.
एकदा अनुष्का करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली होती. पण तेव्हा तिने जे विधान केले ते ऐकून करणला धक्काच बसला होता. अनुष्काने नॅशनल टीव्हीवर सांगितले होते की करण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. तसेच जॅकलीनलाही हा अनुभव आला असल्याचे तिने सांगितले होते. सध्या व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लीप करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोची आहे. या शोमध्ये अनुष्काने करणची पोलखोल केली होती.
‘ए दिल है मुश्कील’च्या चित्रीकरणादरम्यान करणचे अनुष्कावर क्रश असल्याचे त्याने उघड केले होते. त्यावर अनुष्काने उत्तर दिले की ती आनंदी आहे. यानंतर ती मस्करीच्या मूडमध्ये आली आणि म्हणाली, “मी त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणार आहे. कधीकधी तो मला चुकीचा स्पर्श करायचा.” त्यामुळे करणही काही काळासाठी स्तब्ध झाला होता. तिच्यासमोर काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते. दरम्यान, अनुष्का जरी हे मस्करीत बोलत असली तरीदेखील तिने अप्रत्यक्षरित्या सिनेमाच्या सेटवर घडलेला किस्सा चाहत्यांना जाहीरपणे सांगितला आहे.