नवी दिल्ली – मला शिकण्याची इच्छा आहे.. मदत करा सर अशी इच्छा एका मुलीने थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. मुलीने लोकसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विनंती करत आपली व्यथा मांडली. पुढील ४८ तासांमध्ये मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना विविध सरकारी योजनांचा लाभ मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला. झारखंडमधील या प्रकाराने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
बेबी कुमारी असं या मुलीचं नाव आहे. ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय गढवा येथील तिलदागमध्ये वास्तव्यास आहे. लोकसंवाद कार्यक्रमादरम्यान तिने थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.त्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये बेबी कुमारीला सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत मदत करण्यात आली. तसेच तिच्या बहिणींना शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे. यासोबतच तिच्या आईला बकरी पाळण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन विकास योजनेशी जोडण्यात आलं आहे.इंद्रेश राम हे बेबी कुमारीचे वडील असून त्यानं देखील मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेंतर्गत पाच लाख रुपये देण्यात आले आहेत.
तिलदाग पंचायत के #लोक_संवाद में माननीय मुख्यमंत्री जी को बेबी कुमारी ने कहा कि, ‘मैं पढ़ना चाहती हूँ सर, मेरी मदत कीजिए’.मुख्यमंत्री जी के निर्देश पर दो दिनों के अंदर पूरे परिवार को विभिन्न योजनाओं से जोड़कर स्वीकृति पत्रों के साथ डीसी पहुंचे बेबी कुमारी के घर 1/4@HemantSorenJMM pic.twitter.com/Vi6cz7r2fH
— DC_Garhwa (@dc_garhwa) December 10, 2022
मदतीनंतर बेबी कुमारीने संपूर्ण कुटुंबियांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आपण मोठं होऊन शिक्षक बनणार असल्याचे देकील यावेळी बेबी कुमारीने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी देखील या मदतीनंतर एक ट्विट केले आहे. ” हा भाऊ तुझ्यासोबत आहे.. तू खूप शिक” असं मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहेत.