श्रीनगर : रियल काश्मीर संघाने गुरूवारी गतविजेत्या चेन्नई सिटी संघाचा २-१ ने पराभव करत ‘आय लीग’ मध्ये या सत्रात पहिला विजय नोदंवला.
रियल काश्मीरकडून दानिश फारूकने २२ व्या तर आयवरी कोस्टच्या बाजी आर्मएंडने २७ व्या मिनिटाला गोल केला तर चेन्नईकडून सैयद सुहेल पाशाने ४८ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
रियल काश्मीर संघाचा हा तिसरा सामना होता. मागील दोन सामन्यात त्यांनी ईस्ट बंगाल आणि टिडीम रोड एथलेटिक यूनियन (टीआरएयू) विरूध्द सामन्यात बरोबरी साधली होती. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर श्रीनगर मध्ये हा पहिला सामना होता.
FULL-TIME! The referee blows his whistle and brings an end to the game 🙌@realkashmirfc get their first win of the season 💪
RKFC 2-1 CCFC
📺: https://t.co/ASvRgKc94E#RKFCCCFC ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/S3KqgZxwxJ
— Hero I-League (@ILeagueOfficial) December 26, 2019