मुंबई – मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला होता. आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत, प्राजक्ता ओठांना लावलेली लिपस्टिक पुसताना दिसत आहे तसेच “बॅन लिपस्टिक’ असे म्हणत आहे.
“मला लिपस्टिकचा रंग नको. मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही, बॅन लिपस्टिक’, असेही प्राजक्ता या व्हिडिओ म्हणताना दिसत आहे. #lipstickban असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे अश्या अनेक अभिनेत्रींनी “बॅन लिपस्टिक’ हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंटमध्ये “क्या हुआ भाई?’ असा प्रश्न विचारला होता.
View this post on Instagram
तेजस्विनी आणि प्राजक्ता व्हिडिओमध्ये लिपस्टिक लावतात आणि नंतर पुसून टाकतात. मराठमोळ्या अभिनेत्रींनी हे व्हिडिओ शेअर केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते आहे. अभिनेत्रींच्या या कृतीमुळे कलाकारदेखील गोंधळून गेले आहेत.
या व्हिडिओमध्ये दोघींनीही लावलेली लिपस्टीक पुसून टाकली आहे आणि कॅप्शन दिले होते की, लिपस्टिकला माझा विरोध आहे तसेच “बॅन लिपस्टीक’ असा हॅशटॅग वापरला होता. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
यामागचे नेमकं सत्य काय? आगामी चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ आहे का? पब्लिसिटी स्टंट आहे? अशी चर्चा रंगली आहे. अभिनेत्रींनी शेअर केलेल्या व्हिडिओवर काहींनी आक्षेपही घेतला आहे. “लिपस्टिक लावलीच आहे तर पुसताय का’ असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
आता हा प्रमोशन फंडा आहे की आणखी काही वेगळं प्रकरण आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. मागेही “नो ब्रा’ म्हणजे ब्रा वापरू नये अशा आशयाचे व्हिडिओ हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्रींकडून सोशल मीडियावर शेअर केले गेले होते.