मुंबई – WWE माहित नाही असा एकही व्यक्ती या काळात सापडणे कठीण.! आपल्याकडे WWE प्रसिद्ध होण्यामागचं तसं काही स्पेशल कारण नाही. जसं क्रिकेटसाठी आपण वेडे आहोत तसंच WWE साठी काही लोकं वेडे आहेत.
संपूर्ण जगात WWE मधील सर्वच रेसलर स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. आणि याच रेसलर्समुळे WWE चा अनोखा चाहता वर्ग निर्माण निर्माण झाला आहे. सध्या WWEमधील प्रसिद्ध रेसलर ‘चेल्सी ग्रीन’ ही आपल्या एका व्यक्तव्या मुळे चांगलीच चर्चेत आहे.
तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजब खुलासा केला आहे. “रेसलिंगदरम्यान मी अंतर्वस्त्र घातल नसल्याचे” चेल्सी ग्रीन म्हंटलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान तिने हे वक्त्यव्य केलं आहे.
या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘मी कधीच अंतर्वस्त्रे घालत नाही. म ते वर्कआऊट करताना असो, रेसलिंग दरम्यान असो किंवा जीन्स घातलेली असो मी कधीच अंतर्वस्त्रे घालत नाही. मला कधीच अंतर्वस्त्रे घालायला आवडत नाहीत.’
पुढे चेल्सी म्हणते कि, याबद्दल माझ्या जवळच्या लोकांना आणि बॉयफ्रेंड मॅथ्यूला देखील याबाबत माहिती आहे. आणि मला शरीराला हवेचा स्पर्श झालेला आवडतो. त्यामुळे मी अंतर्वस्त्र घालणे टाळते.
चेल्सी ग्रीन 2018 ते 2020 मध्ये WWE मध्ये दिसली होती. तिचा चाहता वर्ग देखील मोठा होता. पण एकदा लढताना चेल्सीच्या हाताचे मनगट तुटले. आणि आता तिने इम्पॅक्ट रेसलिगमध्ये पाऊल टाकले आहे.