सावित्रीच्या शंभर लेकींचा रविवारी होणार गौरव

प्राथमिक शिक्षक बॅंकेचा शताब्दी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम

नगर – जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बॅंकेतर्फे सभासद महिला शिक्षिकांचा सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन साहेबराव अनाप, व्हा. चेअरमन बाळासाहेब मुखेकर व बॅंक शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी दिली.

राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी,दि.24 सकाळी 11 वाजता नंदनवन लॉन येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमास साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक व जिल्ह्याची सुकन्या तेजस्वी सातपुते ,सांगलीच्या कवियत्री व लेखिका डॉक्‍टर स्वाती शिंदे, अमरावती येथील शिक्षण तज्ञ,अभिनेत्री जिजाऊ फेम डॉ. स्मिता देशमुख प्रमुख पाहुण्या व वक्‍त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर , शिक्षणाधिकारी दिलीप थोरे व रमाकांत काटमोरे, राज्य संघाचे पदाधिकारी बाळकृष्ण तांभारे,आंबादास वाजे,अप्पासाहेब कुल, नाशिक विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप, गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब तांबे, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्युलता आढाव, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता कुलट ,कैलास चिंधे ,केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ घायतडक, नगरपालिका संघाचे मच्छिंद्र लोखंडे,,रामेश्वर चोपडे आदींची उपस्थिती राहणार आहे. संचालक मंडळाने जिल्ह्यातील सभासद महिलांमधून शैक्षणिक, सामाजिक तसेच क्रीडा, कला, वकृत्व, या क्षेत्रातील कर्तृत्वान महिला शिक्षकांची निवड केली असून शिक्षक बॅंकेच्या शंभर वर्षाच्या ऐतिहासिक प्रगतीमध्ये महिला सभासदांचा सिहाचा वाटा आहे.

हजार कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करीत असलेल्या व शतकपूर्ती केलेल्या शिक्षक बॅंकेने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे संसार फुलविण्यात मोठा हातभार लावला आहे. या कामधेनूचा शतक महोत्सवी वर्षात महिला सभासदांचा गौरव करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला ही अतिशय अभिमानास्पद बाब असून जिल्ह्यात कार्यरत महिला भगिनींमध्ये अनेक कर्तबगार, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, शिष्यवृत्ती, वक्तृत्व आदी क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांमधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहेत. तसेच शिक्षक बॅंक शताब्दी वर्षात संस्मरणीय असा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील सर्व सभासद बंधु भगिनी, सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक बॅंक संचालक मंडळाने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)