हैदराबाद – हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींची चमककीमध्ये हत्या करण्याच्या घटनेची चौकशी करण्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुरुवात केली आहे. ज्या सरकारी रुग्त्णालयामध्ये चारही आरोपींचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत, त्या महबुबनगरमधील रुग्णालयाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने भेट दिली.
चारही आरोपींची चकमकीमध्ये हत्या झाल्याची दखल घेऊन आयोगाने शुक्रवारी या चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले. अशाप्रकारे चकमकीमध्ये आरोपींची हत्या होणे ही चिंतेची बाब असून त्याची काळजीपूर्वक तपासणी होणे गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
जेथे ही चकमक झाली त्या हैदराबादपासून 50 किलोमीटरवरील चत्तानपल्ली येथील गावातील घटनास्थळाला आणि जेथे पीडीत तरुणीवर 27 नोव्हेंबरला सामूहिक बलात्कार झाला त्या शहराच्या बाहेरील टोल प्लाझालाही हे आयोगाचे पथक भेट देणे अपेक्षित आहे.
चारही आरोपींचे मृतदेह जतन करून ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने शुक्रवारीच राज्य सरकरला दिले आहेत. या चारही आरोपींच्या शवविच्छेदनाचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.