मद्यधुंद चालकाने फरफटत नेल्याने तरुणीचा बळी
मुंबई – चुनाभट्टी येथील धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिरजवळ 19 वर्षाच्या तरुणीला मद्यधुंद चालकाने धडक देऊन गाडीखाली चिरडले. या हीट ऍण्ड रन प्रकरणातील अपघातात युवतीचा जागीचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हा अपघात चुनाभट्टी येथील धावजी मार्गावरून रात्री ठीक 8.45 वाजण्याच्या सुमारास व्ही. एन. पूरव मार्गावर झाला. या कारमधील मद्यधुंद चालकाने बाजारात खरेदी करुन घरी चालत जाणाऱ्या दोन मुली व एका महिलेला धडक दिली. यामध्ये अर्चना पारठे वय (19वर्षे) या मुलीला चालकाने स्वदेशी मिल चाळ नंबर 113 येथे फरफटत नेत गाडीखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर बाजूने जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या. या जखमी महिलांना उपचारासाठी दळवी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे.
धडक देणाऱ्या गाडीत एकूण तीन तरुण होते. ते पूर्णपणे नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यावेळी भरधाव कारने जवळपास चार ते पाच गाड्यांचे नुकसान केले. पोलिसांनी गाडीतील 2 तरूणांना अटक केली आहे. परंतु गाडीचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. चुनाभट्टी परिसरात झालेल्या अपघातात संदर्भात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना ताब्यात घेतलेला आहे.