हुमा कुरेशीला आज विमानतळावर खूपच अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे हुमा चांगलीच भडकली आणि तिने स्पाईसजेट या विमान कंपनीला खूप शिव्या घातल्या. “बेल बॉटम’ या आपल्या आगामी सिनेमामुळे हुमा कुरेशी खूप चर्चेत आहे.
View this post on Instagram
ती सध्या या सिनेमाचे प्रमोशन करते आहे. याचसाठी तिला खूप प्रवासदेखील करावा लागतो आहे. आज पहाटे तिला विमानाने जायचे होते. त्यासाठी पहाटे 5.30 वाजताच ती विमानतळावर उपस्थित होती. मात्र तरीही 6.30 वाजण्याच्या विमानात तिला प्रवेश मिळू शकला नाही. हे विमान ओव्हरहबुक झाल्याचे तिला सांगण्यात आले.
View this post on Instagram
म्हणून तिने ट्विटरवर या विमान कंपनीची चांगलीच खरडपट्टी काढली. हे विमान चुकल्यामुळे पुढची कनेक्टिंग फ्लाईट देखील टुकणार असल्याचे हुमाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र नंतर तिला आपल्याच ट्विटचा राग आला असावा म्हणून तिने हे ट्विट डिलीट करून टाकले आहे.
View this post on Instagram
तिच्या “बेल बॉटम’चा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा “बेल बॉटम’ हा पहिलाच सिनेमा असणार आहे. हा सिनेमा 3 डी मध्ये रिलीज केला जाणार आहे ही या सिनेमाची आणखीन एक खासियत आहे.