दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत. यानंतर या परिसरात डिस्ट्रिक्ट रिजर्व ग्रुपच्या पथकाने सर्च ऑपरेशन सुरु करून बचाव कार्याला सुरु केले. यादरम्यान एका जवानाच्या हातात त्याच्याच आईचा मृतदेह लागला. हातात आपल्या आईचा मृतदेह पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी दिवसावर आयोजित एका कार्यक्रमासाठी हीरानार येथे दंतेवाडा जिल्ह्यातील काही रहिवासी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून जात होते. यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर बाजुच्या तलावात कोसळला. त्यानंतर येथे डिस्ट्रिक्ट रिजर्व ग्रुप जवानांचे तेलम-टेटम परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होते.
यावेळी एक जवानाला हातात एका महिलेचा मृतदेह आला. त्याने त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर त्याला खूप मोठा धक्काच बसला. तो मृतदेह जोरजोरात रडू लागला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरातील सर्वांनाच धक्का बसला आहे.