चीनमध्ये धुळीचे प्रचंड वादळ

बीजिंग – चीनमधील दुनुआंग शहरामध्ये आज धुळीचे प्रचंड वादळ निर्माण झाले. या वादळामुळे दृश्‍यमानता 20 फूटांपेक्षाही कमी झाली होती. या वादळानुळे रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला होता. त्यानुळे पोलिसांना प्रमुख महामार्गांवरील वाहतुक थांबवावी लागली. गोबीच्या वाळवंटाजवळच हा धुळीचे वादळ निर्माण झाले होते.

दरम्यान चीनमध्ये आतेल्या इन-फा या वादळामुळे शांघाय शहरातील सार्वजनिक व्यवहार आज विस्कळीत झाले होते. पूर्व चीनमधील हवाई वाहतुकीसह रस्ते वाहतुक आणि रेल्वे वाहतूकहीोमोठ्या प्रमाणावर स्थगित करण्यात आली होती. पूर्व-चीनच्या झेजियांग प्रांतात सोमवारी सकाळच्या सुमारास इन-फा वादळाचा दुसरा लॅंडफॉल झाला.

या वर्षात आलेले हे सहावे वादळ आहे. झिंगासिंग शहर प्रशासनाच्या अधीन असलेल्या काउन्टी स्तरावरील शहर पिंगुजवळ किनारपट्टीवर ते थडकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेनान प्रांतात आलेल्या पूरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता 69 वर पोहोचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.