पुणे – लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता ‘हृतिक रोशन’ केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. हृतिकचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर अनेक तरुणी घायाळ आहेत. त्यामुळेच त्याच्याशी लग्न करावं असं प्रत्येक मुळीच स्वप्न आहे.
हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019 ‘ च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ‘टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ आणि ‘ग्रीक गॉड’ अश्या यादीत सुद्धा हृतिकने स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
अभिनेता हृतिक रोशन शरीरासाठी किती मेहनत आणि पैसा खर्च करतो हे तुम्हाला माहीत आहे का? अभिनेता दररोज त्याच्या फिटनेसशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच त्याचा सिक्स पॅक अॅब्स असलेला फोटो समोर आला असून, यामध्ये तो कमालीचा हॅंडसम दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘मला फिनिश लाइन दिसत नाही…’ अभिनेत्याच्या या फोटोवर अनिल कपूर पासून प्रीती झिंटा आणि करण सिंग ग्रोव्हरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या कमेंट केल्या आहेत. त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि माजी पत्नी सुजैन खान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, हृतिक रोशनच्या या पोस्टनंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, तो त्याचा पर्सनल ट्रेनर क्रिस गेथिनला दर महिन्याला 20 लाख रुपये मानधन देतो. मात्र, अलीकडेच हृतिक रोशनने त्याच्या फिटनेस ट्रेनरला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, माझे परिवर्तन कोणत्याही चित्रपटासाठी नाही.
मला एक मजेदार जीवनशैलीची सवय लागली आहे जेणेकरून मी आयुष्यभर त्याचे अनुसरण करू शकेन. ‘जेव्हा मी ‘वॉर’ चित्रपट करणार होतो, तेव्हा मला वाटायचे की मी मरेन. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि त्या चित्रपटासाठी तयार नव्हतो पण आता मला नेहमी परिपूर्ण आणि तंदुरुस्त राहायचे आहे. असं देखील तो म्हणाला.