बॉलीवूडमधील ऍक्शन हिरो अर्थात हृतिक रोशनकडे सध्या अनेक चित्रपटांची रांग लागलेली आहे. ब्रिटिश वेबसिरीज “द नाइट मॅनेजर’च्या हिंदी रिमेकच्या माध्यमातून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. मात्र, या वेबसिरीजमधून हृतिकने माघार घेतली आहे.
या वेबसिरीजसाठी निर्मात्यांनी हृतिकला 75 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. परंतु हृतिक रोशनने ही ऑफर धुडकावून लावली आहे. आता “द नाइट मॅनेजर’मध्ये आदित्य रॉय-कपूरची एंट्री झालेली आहे. ही आदित्य रॉय-कपूरची पहिली वेब सीरिज ठरणार आहे.
या सिरीजचे लवकरच शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये आदित्य रॉय-कपूर हा टॉम हिडलटनची भूमिका साकारणार आहे. या सिरीजमध्ये अनिल कपूर सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या दोघांनी यापूर्वी “मलंग’मध्ये एकत्रित काम केले होते.
दरम्यान, वेब सिरीजच्या मेकर्सने शूटसाठी वेगवेगळे लोकेशन्स निश्चित केले असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. “द नाइट मॅनेजर’चे दिग्दर्शन संदीप मोदी करणार आहेत.