फराह खानच्या आगामी चित्रपटात रितिक आणि अनुष्का झळकणार एकत्र

मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध् दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. या चिपटात अभिनेत्री अनुकष्का शर्मा आणि अभिनेता रितिक रोशन सोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फराह खानचा आगामी चित्रपट २०२१ साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच नाव अद्याप ठरवण्यात आलेल नाही. मात्र, लवकरच या चित्रपटाबद्दलची घोषणा केली जाणार आहे. रोहित शेट्टीदेखील फराह खानसोबत या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, हृतिक रोशनचा ‘वॉर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने २२५ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.