अमिषा पटेलवर २.५ कोटींचा फसवणुकीचा आरोप; एफआयआर दाखल

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल लाइमलाईटपासून दूर असली तरीही अनेक कारणांनी चर्चेत असते. अमिषा पटेलबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमिषा पटेलवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल यांच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. अजय कुमार सिंह यांनी सांगितले कि, एका चित्रपटासाठी अमिषा आणि कुणाल यांनी २.५ कोटी रुपये घेतले होते. यानंतर चित्रपट २०१३ साली बनविण्यास सुरुवात झाली. २०१८पर्यंत हा चित्रपट पूर्ण होऊन रिलीज होईल व व्याजसहित पैसे परत देईल, असे वचन अमिषाने मला दिले होते. दरम्यान चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही.

अमिषाकडे निर्माता पैसे मागण्यास गेले असता तिने ३ कोटींचा चेक दिला. परंतु, बँकेत तो चेक बाउंस झाला. याबद्दल अमिषाला जाब विचारला असता तिने पॉवरफुल व्यक्तींसोबत फोटो काढून मला धमकविण्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी अमिषा पटेलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.