Digital Voter ID Download : अजूनही डाऊनलोड केलं नाही डिजिटल ‘मतदान कार्ड’? जाणून घ्या कसं करायचं

Digital Voter ID Download – आधार कार्ड (Aadhaar Card) प्रमाणे आता तुम्ही मतदान कार्डही (Voter ID) डाऊनलोड करू शकता. यासाठी देशभरात इलेक्टाॅनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्डची सुरूवात करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाच्या वेबसाइटवरून डिजिटल मतदान कार्ड सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता. तसेच तुम्ही याला डिजिटल लाॅकर मध्येही सुरक्षित ठेवू शकता.

डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा दोन टप्प्यात दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारीपर्यंत नवीन मतदार डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करू शकत होते. तर दुसऱ्या टप्प्याची सुरूवात फेब्रुवारीपासून झाली आहे. या टप्प्यात सर्व मतदार आपले डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करू शकतात.

डिजिटल मतदान कार्डसाठी तुमचा मोबाइल नंबर निवडणुक आयोगाच्या वेबसाइटवर रजिस्टर करणे महत्वाचे आहे. निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता.

येथून डाऊनलोड करा डिजिटल मतदान कार्ड –

मतदान कार्ड ची डिजिटल काॅपी वोटर हेल्पलाइन अॅप किंवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता. अॅपवर लाॅगइन केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड ई-ईपीआयसी चा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा मतदान कार्ड नंबर डायल करून तुम्ही पीडीएफ फाॅर्मॅट मध्ये तुमचे वोटर आयडी डाऊनलोड करू शकता. पीडीएफ फाईलमध्ये एक क्यू आर कोड देखील दिसेल, त्याला स्कॅन करून पूर्ण माहिती पाहू शकता. तसेच नवीन मतदारांना त्यांच्या मतदान कार्डची हार्ड काॅपी देखील मिळेल.

असं करा डाऊनलोड –

डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर https://voterportal.eci.gov.in जावे. किंवा राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (NVSP) https://www.nvsp.in/account/login वर जावे.

मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल. मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकता. जर तुम्ही अगोदरच अकाउंट काढलेले असेल तर तुम्हाला ईपीआयसी नंबर किंवा फाॅर्म रेफरंस नंबर टाकावा लागेल. यानंतर रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो वेब पोर्टलवर भरावा लागेल.

यानंतर डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ई-ईपीआयसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मतदान कार्ड पीडीएफ फाॅर्मॅटमध्ये डाऊनलोड करता येईल. त्यानंतर ते प्रिंट करून घेऊ शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Comment
  1. Narendra Kulthe says

    Tried to do all the steps, but not able to complete ekyc… Message displays as ‘still not working, do it later..

Leave A Reply

Your email address will not be published.