चंदिगढ – पंजाबच्या जलालाबाद नगर कौन्सिलच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि नंतर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार जलालाबाद येथील एसडीएसच्या कार्यालयाच्या बाहेर घडला आहे.
या हल्ल्यातून बादल स्वत: बचावले आहेत. पण त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. हा हल्ला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
#WATCH | Shiromani Akali Dal (SAD) president Sukhbir Singh Badal's vehicle attacked in Jalalabad, Punjab.
(Note: Strong language) pic.twitter.com/kH9HWL9ZPg
— ANI (@ANI) February 2, 2021
इंग्रजी वर्तमान पत्र ट्रिब्यूनशी संवाद साधताना युथ अकाली दलचे प्रमुख परमबंस सिंग रोमाना यांनी सांगितले की, काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात अकाली दलाचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्लेखोर जमावाचं नेतृत्व काॅंग्रेस आमदाराचा भाऊ करत होता, असेही त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.