Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. ( Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID )
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.
यावेळी निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या देशात 97 कोटीहून अधिक मतदार असून, त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.7 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.
दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांना फॉर्म 12 डी देण्यात येईल. अशा मतदारांना फॉर्म 12 डी घरपोच दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. ( Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID )
पण, आपल्या देशात असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे मतदान ‘व्होटर आयडी’ हे अद्याप नाहीये. अशा वेळी आपण मतदान करू शकतो का असा सर्वसामान्यांना प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ओळखपत्र नसेल तर सर्वात आधी काय कराल? हे देखील सांगणार आहोत….. ( Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID )
मतदान ‘व्होटर आयडी’ नसेल तर सर्वात आधी काय कराल?
सर्वात आधी नोंदणीकृत (रजिस्टर्ड) मतदार म्हणून तुमचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे. जर नाव नोंदणीकृत नसेल तर फॉर्म-6 भरून तुमच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे हा फॉर्म जमा करावा लागेल. त्यानंतर तुमचं नाव मतदार यादीत मतदार म्हणून नोंदवले जाईल. तुम्ही फॉर्म-6 ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी सबमिट करू शकता.
‘व्होटर आयडी’ नसल्यास मत देण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, तुमच्याकडे 11 फोटो आयडी कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणं गरजेचं आहे. तुमचं मतदान करण्यापूर्वी ही कागदपत्र दाखवणं आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये तुम्हाला, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र-राज्य सरकार, पीएसयू किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीने जारी केलेले फोटो असलेले
आय कार्ड, बँक-पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो असलेले पासबुक, पॅन कार्ड, एनपीआरद्वारे आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, तुमच्या फोटोसह पेन्शन डॉक्युमेंट, खासदार-आमदार आणि आमदारांसाठी जारी केलेले अधिकृत आय कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
‘व्होटर आयडी’ नसल्यास मतदान करू शकता का?
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, मतदार ओळखपत्र असल्याने तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात याची खात्री देता येत नाही. मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणं फार गरजेचं आहे. तुमचे नाव मतदार यादीत असल्यास आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तुमच्याकडे 11 अनिवार्य ओळखपत्रांपैकी कोणतेही एक असल्यास, तुम्हाला मतदान करण्याची परवानगी दिली जाते.
आचारसंहिता म्हणजे काय?
निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र आचारसंहिता नेमकी काय आहे? ती कधीपासून लागू केली जाते. या प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेऊयात. देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका संपन्न व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत.
त्या नियमावलीलाच आचारसंहिता म्हटले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नियमांचे पालन करणे सरकार, राजकीय पक्ष आणि या पक्षांचे नेते यांच्यासाठी बंधनकारक असते.
केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करावे याची निवडणूक आयोग घटनेच्या कलम 324 अन्वये खबरदारी घेते. त्याचबरोबर याचीही खबरदारी घेतली जाते निवडणुकीच्या हेतूने अधिकारी प्रणालीचा दुरूपयोग होऊ नये.
निवडणुका जाहीर झाल्या की त्या क्षणापासून सरकारी कर्मचारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू करण्यात आलेली व्यवस्था आहे.