Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. ( Lok Sabha Election 2024 । Voting | Voter ID )
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.
यावेळी निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या देशात 97 कोटीहून अधिक मतदार असून, त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.7 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.
दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांना फॉर्म 12 डी देण्यात येईल. अशा मतदारांना फॉर्म 12 डी घरपोच दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. पण, चुकून तुमचं मतदान ‘व्होटर आयडी’ हरवलं असेल किंवा तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करायचं असल्याचं काय पद्धत आहे, याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत…..
असं करा ‘व्होटर आयडी’ डाऊनलोड; पाहा सोपी पद्धत…. ( Lok Sabha Election 2024 । voter id missing | Voter ID )
- सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.
- पुढे New User पर्यायावर क्लिक करा आणि तिथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल.
- मग तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.
- संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अॅप्लिकेशन नंबर प्राप्त होईल.
- या नंबरचा उपयोग मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.
- या संपूर्ण प्रक्रियेनंतर मतदान ओळखपत्र डाउनलोड करावे.