नवी दिल्ली – तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे असेल तर आता तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या काही मिनिटांत लायसन्स रिन्यू करता येऊ शकते.
ड्रायव्हिग लायसन्स रिन्यू कसे करावे?
– सर्वात पहिले तुम्हाला परिवहन विभागाच्या parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– येथे तुम्हाला ‘ड्रायव्हिग लायसन्स संबंधित सेवा’वर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर अर्ज करण्यासाठी ‘डीएल सेवा’वर क्लिक करावे लागेल.
– येथे तुम्हाला तुमच्या डीएल नंबरसोबत सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल.
– सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
– नंतर जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन स्लाॅट बुक करण्यासाठी पेमेंट करावे लागेल.
– आरटीओ कार्यालयात तुमच्या बायोमेट्रिक डिटेल्सची तपासणी होईल आणि तुमची कागदपत्रे पडताळली जातील.
– त्यानंतर तुमचे लायसन्स रिन्यू होईल.
– अशा प्रकारेच तुम्ही तुमचे आरसी देखील रिन्यु करू शकता.
डीएल रिन्यू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
– सर्वात पहिले फाॅर्म डी डाऊनलोड करून भरावा लागेल.
– त्यानंतर स्कॅन करून ते अपलोड करावे लागेल.
– याशिवाय तुमचे वय जर 40 वर्षाहून अधिक असेल तर तुम्हाला सर्टिफाईड डाॅक्टरांडून भरलेला फाॅर्म 1ए पाहिजे.
– ओरिजनल एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्डचा फोटो अपलोड करावा लागेल.
अन्यथा दंड भरावा लागेल –
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर रिन्यु करण्यासाठी परिवहन विभागाकडून 30 दिवसांचा वेळ दिला जातो. जर तुम्ही त्या 30 दिवसांत तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यु न केल्या स दंड भरावा लागतो. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करा.