‘हाऊसफुल ४’ नंतर ‘दबंग ३’ आणि ‘छपाक’चं ट्रेन मध्ये प्रमोशन

‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे नुकतेच ट्रेनमध्ये प्रमोशन करण्यात आले. त्यानंतर आता ‘दबंग ३’ आणि ‘छपाक’ चित्रपटाचं सुद्धा ट्रेनमध्ये प्रमोशन होणार आहे. तसा प्रस्ताव रेल्वे शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, चार्टर्ड ट्रेनला चित्रपट प्रमोशन कामासाठी वापरल्यामुळे ट्रेनसाठी फायद्याचे ठरत आहे. फिल्म प्रमोशन सोडून टिव्ह शो’साठी सुद्धा चार्टर्ड ट्रेनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून   कपिल शर्मा शो आणि केबीसी या शोसाठी सुद्धा चार्टर्ड ट्रेनची अर्जंट मागणी होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी रेल्वेने फिल्म, आर्ट आणि कल्चर यासाठी रेल्वे भाड्याने देण्याचा प्रस्ताव काढला होता. यासंदर्भात काही पॉलिसी बनवल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने ७ ऑक्टोबरला मुंबई मधील फिल्म कंपन्यांना पत्र पाठवून याची माहिती दिली होती. त्यामध्ये नवीन फिल्म चे प्रमोशन हे चार्टर्ड ट्रेन द्वारा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.