पुण्यात तलवारीने वार करून हॉटेल मालकाचा खून

पुणे – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर रुग्नालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.

रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजनेच्या सुमारास तलवारीने जिवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर रामदास आखाडे यांनी मृत्युशी दिलेली झुंज तब्बल बावन्न तासानंतर अपयशी ठरली. रामदास आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.