वॉशिंग्टन – जगात सर्वत्र चित्रपट शौकिनांना भयपटाचे म्हणजेच हॉरर चित्रपटांचे आकर्षण असते या चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी झालेले असते त्या जागांविषयी सुद्धा शौकिनांना उत्सुकता असते आता जगातील प्रमुख भयपटांच्या यादीत असलेल्या एका चित्रपटाचे चित्रीकरण ज्या बंगल्यात झाले होते तो बंगला आता विक्रीला काढण्यात आला असल्यामुळे शौकिनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
1970 च्या दशकामध्ये हॅलोवीन हा चित्रपट अमेरिकेसह जगभरात सर्वत्र प्रसिद्ध झाला होता आणि हा एक लोकप्रिय भयपट होता या चित्रपटाचे चित्रीकरण ज्या बंगल्यामध्ये झाले होते तो बंगला आता त्या मालकाने विकायला काढला आहे परकीय संस्कृतीमध्ये जी हॅलोवीन ही परंपरा आहे त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटामध्ये कथानक रचण्यात आले होते बहुतेक सर्व घटना या घरातच घडत होत्या आता हे घरच विक्रीला काढण्यात आले आहे हे घर म्हणजे एक बैठा बंगला असून त्यामध्ये चार बेडरूम हॉल आणि इतर सर्व सुविधा आहेत.
आवारात मोठी बाग असून तेथे अनेक झाडेही लावण्यात आली आहेत या घराची किंमत 18 लाख डॉलर्स ठरवण्यात आली आहे लॉस एंजल्स मधील साउथ पेसाडोना येथे हे घर असून त्यामध्ये 1978 मध्ये हॅलोवीन चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते मनोरुग्णालयातून पाळलेल्या मायकल मेयर्स नावाच्या एका मनोरुग्णाची ही कथा होती आणि वेडाच्या भरात तो ज्या प्रकारे खुनाची मालिका करतो त्याचे कथानक या चित्रपटात होते.