मेष : घरात औषधपाणी, दुरुस्ती इ. गोष्टींवर खर्च होईल. जास्त दगदग धावपळ करू नका.
वृषभ : प्रयत्न व नशिब यांची सांगड घालून कामे मार्गी लावाल. तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.
मिथुन : सरकारी नियमांचे पालन करताना अडथळे येतील तरी सबुरीचे धोरण ठेवा. येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा.
कर्क : चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न राहील. सहकाऱ्यांच्या अनावधानाने अपमान होणार नाही याची
काळजी घ्या.
सिंह : कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. पैशाचा अतिमोह टाळा. घरात दोन पिढ्यांतील अंतर जाणवेल.
कन्या : तरूणांना प्रेमात रूसवे फुगवे सहन करावे लागतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. खर्च करता येईल.
तूळ : मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. महिलांनी इगो बाजूला ठेवावा.
वृश्चिक : व्यवसायात कामातील अटी व शर्तींचा विचार करून मगच नवीन कामे हाती घ्या.
धनु : नोकरीत योग्य वेळी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. केलेल्या कामाचा मोबदलाही मिळेल.
मकर : बोलण्यावर मात्र विशेष संयम ठेवा. घरातील गोष्टींचा कामावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या.
कुंभ : पैशाचे गणित कोलमडणार नाही याची दक्षता घ्या. हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याकडे कल राहील.
मीन : नवीन खरेदीचा मोह होईल. मनोबल उंचावेल. तरुणांचे विवाह ठरतील. अनपेक्षित लाभ होतील.