आजचे भविष्य (सोमवार, दि. २८ डिसेंबर २०२०)

मेष : नोकरीत कामात आळस केलात तर तो वरिष्ठांच्या नजरेत येईल. झेपेल तेवढी मदत अवश्‍य करा.

वृषभ : नोकरीत आपले काम बरे की आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल. पैशाची चिंता मिटेल.

मिथुन : खेळत्या भांडवलाची तरतूद बॅंका व हितचिंतकांच्यामुळे होईल. घरात विचारल्याखेरीज सल्ला देऊ नका.

कर्क : तटस्थपणे राहून कामे स्विकारा व वेळेत संपवा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

सिंह : नोकरीत आव्हानात्मक काम कराल. जोडधंद्यातून फायदा होईल. तरुणांना दिशा मिळेल.

कन्या : नोकरीत आवडीच्या कामासाठी तुमची निवड होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. नवीन ओळखी होतील.

तूळ : थोडी चिडचिड होईल. नोकरीत कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते अपूरेच वाटेल. परंतू उलटं बोलू नका.

वृश्‍चिक : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत मिळालेल्या सवलतींचा लाभ घ्याल.

धनु : नवीन करारमदार पुढे ढकला. नोकरीत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करु नका.

मकर : नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्व कळेल. मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.

कुंभ : सहकाऱ्यांच्या आडमुठया स्वभावाचा थोडा राग येईल. तरी चांगल्या शब्दात त्यांना समज दया.

मीन : नवीन सौदे करण्यापूर्वी त्यातील अटी नियम वाचा व व्यक्तिंची नीट माहिती करुन घ्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.