मेष : सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. कामानिमित्ताने ओळखी होतील. घरात मनासारख्या घटना घडतील.
वृषभ : कामात विस्तार होईल. घरात व्यक्तिगत कामांना वेग येईल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल.
मिथुन : घरात व्यक्तिंच्या स्वास्थाविषयी चिंता वाटेल. वाढीव खर्चामुळे पैशाची चिंता राहील.
कर्क : महिलांना मनःशांती मिळवणे गरजेचे भासेल. जोडधंदा असणाऱ्यांना विशेष लाभ मिळतील.ओळखी होतील.
सिंह : घरात वाढता खर्च होईल. त्यासाठी हातातील पैशाचा वापर विचारपूर्वक करा. महिलांचा वेळ मजेत जाईल.
कन्या : वरिष्ठांची मर्जी राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
तूळ : घरात छोटया मोठया खरेदीमुळे समाधान मिळेल. प्रश्नांची उकल झाल्याने मनःशांती लाभेल.
वृश्चिक : काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. नवविवाहितांना छोटयाच्या आगमनाची चाहूल लागेल.
धनु : घरात वातावरण आनंदी व उत्साही असेल. तरूणांना नवीन व्यक्तिचे आकर्षण राहील.
मकर : सहकाऱ्यांना खुश ठेवून आपला मतलब साध्य करून घ्या. घरात वातावरण समाधानकारक असेल.
कुंभ : कामानिमित्ताने सभोवतालचे वर्तुळही बदलेल.मनाप्रमाणे काम करता येईल. प्रवासाचे योग येतील.
मीन : नोकरीत चांगली कामगिरी करून वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडधंदयातून फायदा होईल.